Friday, August 21, 2026
HomeUncategorizedकर्मवीर महाविद्यालय, मूलचा ‘भरारी-२०२६’ सांघिक चषकावर विजय
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूलचा ‘भरारी-२०२६’ सांघिक चषकावर विजय

image_pdfimage_print

मूल   ( मेहुल मनियार )

      गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘भरारी २०२५-२६’ मध्ये कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत साहित्य क्षेत्रात सर्वाधिक सांघिक गुण मिळवून सांघिक विजेतेपदाचा चषक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची पुन्हा एकदा प्रभावी नोंद झाली आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सिद्धी माधव अलोणी हिने प्रभावी सादरीकरण करत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वाद-विवाद स्पर्धेत कु. सिद्धी माधव अलोणी आणि अविनाश अमोल चहारे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट युक्तिवाद मांडत प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला.
याशिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा, नाटक, समूहगीत, तबला वादन आदी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाला साहित्य विभागातील सांघिक चषक मिळविण्यात यश आले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रेरणेमुळे मिळालेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 🎉🏆

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!