Wednesday, October 21, 2026
Homeसहायतावाढदिवसाचा जल्लोष नाही, तर शेतकऱ्यांच्या मदतीचा संकल्प! नगरसेविका अश्विनी रुपेश निकोडे यांचा...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

वाढदिवसाचा जल्लोष नाही, तर शेतकऱ्यांच्या मदतीचा संकल्प! नगरसेविका अश्विनी रुपेश निकोडे यांचा समाजापुढे आदर्श

image_pdfimage_print

प्रभाग क्र. 2 च्या नगरसेविका वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार मदत

मुल ( मेहुल मनियार )
सध्या वाढदिवस म्हटलं की मोठ-मोठे बॅनर, डीजे आणि गाजावाजा हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र याला अपवाद ठरत आहेत

      मूल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका अश्विनीताई रुपेश निकोडे.
आज 21 ऑक्टोबर ला अश्विनीताईंचा वाढदिवस असून, त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर लावणार नाहीत, तसेच कोणताही गाजावाजा करणार नाहीत असा निर्धार केला आहे. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून, राज्यातील दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत देणार आहेत.
या मदतीचा धनादेश लवकरच राज्याचे माजी मंत्री व बल्लारपूरचे लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री निधीकडे सुपूर्द केला जाणार आहे.यावेळी त्यांच्यासोबत रुपेश निकोडे व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.
अश्विनीताईंच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजासाठी धावून जाण्याची त्यांची ही भूमिका खरोखरच सर्व लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा अशीच आहे.

“माझा वाढदिवस हा माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. शेतकरी जगला तरच आपण जगू. म्हणून बॅनरबाजीपेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते,” अशी भावना अश्विनीताई निकोडे यांनी व्यक्त केली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!