Wednesday, October 21, 2026
Homeनशामुक्त अभियानकर्मवीर महाविद्यालयात दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान' उत्साहात संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालयात दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

 

कर्मवीर महाविद्यालयात नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान कार्यक्रम संपन्न

मूल ( मेहुल मनियार )

    शिक्षण प्रसारक मंडळ, मूलद्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे राष्ट्रीय सेवा योजना तसेच मेडिकल विंग राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके होत्या. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी दीपा दीदी उपस्थित होत्या. व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, सुरेश भाई, अश्विनीताई, मोरेश्वर भाई व जितू भाई उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. आजच्या काळात व्यसनमुक्त भारताची उभारणी हीच खरी सामाजिक क्रांती असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त भारताची उभारणी हीच खरी सामाजिक क्रांती असल्याचे नमूद करूनत्यांनी  युवकांनी तंबाखू, गुटखा, मद्य, अमली पदार्थ तसेच सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जोपासणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मार्गदर्शक राजयोगिनी ब्रह्माकुमारी दीपा दीदी यांनी राजयोग ध्यानाद्वारे मानसिक शक्ती वाढवून व्यसनांवर सहज मात करता येते, असे प्रतिपादन केले. त्यांनी ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ विषयी सविस्तर माहिती देत प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहून किमान दहा व्यक्तींना व्यसनमुक्तीचा संकल्प देण्याचे आवाहन केले. व्यक्ती, कुटुंब आणि समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी व्यसनमुक्ती ही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांनी क्रांती दिनाचा संदेश आणि नशामुक्तीचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. सुरेश भाई यांनी विद्यार्थ्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना नशा मुक्तीची सामूहिक शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल बोधे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!