Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणमुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी माती परीक्षण बद्दल शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी माती परीक्षण बद्दल शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

 शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे तसेच शाश्वत शेतीसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे या उद्देशाने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कन्यांनी मारोडा येथे 28 मे 2026 ला ग्रामीण कृषी कार्यानुभव ( RAWE ) या उपक्रमा अंतर्गत  मृदा नमुना संकलन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

       या उपक्रमात महाविद्यालयाच्या कृषी कन्या कु. राधिका डोंगरवार, कु. संस्कृती इटकलवार,कु. स्वानंदी गाडगे कु. दृष्टी गायकवाड यांनी मारोडा “गावातील विविध शेतांमधून मृदा नमुने गोळा केले आणि मातीचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने कसे घ्यावेत, प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी त्यांची तयारी कशी करावी आणि मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली.

    कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेतून या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. एस. आर. मुन्नरवार, डॉ. ए. जे. इंगोले, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश नवघरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.

या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सामू , सेंद्रिय कर्ब आणि क्षारता यांची अचूक माहिती मिळते. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.

याशिवाय शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, मृदा धूप नियंत्रण याविषयीही माहिती देण्यात आली. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते, असे स्पष्ट केले.

कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक शेतकऱ्यांनी नियमित मृदा परीक्षण करून शिफारशीनुसार खत व्यवस्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा उपक्रम शेतकरी व कृषी विद्यार्थी यांच्यातील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणारा व पर्यावरणपूरक शेतीसाठी प्रेरणादायी ठरला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!