Friday, August 21, 2026
Homeसुगंधित तंबाकूप्रतिबंधित तंबाखूची अवैध वाहतूक: मूल पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रतिबंधित तंबाखूची अवैध वाहतूक: मूल पोलिसांची धडाकेबाज कारवाई

image_pdfimage_print

मूल

मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल ₹10,18,490/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹4,18,490/- किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच ₹6,00,000/- किमतीची टाटा पंच कार यांचा समावेश आहे.

ही कारवाई दि. 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेदरम्यान मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ परिसरात (चांदापुर फाटा-गोंडपिपरी रोड) नाकाबंदी दरम्यान करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी, गोंडपिपरी कडून येणारी संशयित टाटा पंच (MH 33 AC 5209) वाहन अडवून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू आढळून आला.

या प्रकरणात सूरज रमेश हजारे (वय 26), साहिल बाबुराव वेस्कळे (वय 22) दोघेही रा. व्याहाड बुज, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत सदर माल राहुल पुरुषोत्तम खोब्रागडे (वय 32), रा. गडचिरोली याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विविध प्रकारचा हुक्का शीशा तंबाखू, ईगल तंबाखू, मजा तंबाखू मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेला होता.

सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे,पोहवा राष्ट्रपाल कातकर,इंदल राठोड,भोजराज मुंडरे, सुनील कुळमेथे आणि त्यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी तीनही आरोपी विरुद्ध  कलम 223, 274, 275, भारतीय न्याय संहिता सहकलम 59 आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम करीत आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षी मूल पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, या धडाकेबाज कारवाईमुळे सर्वत्र मूल पोलिसांचे कौतुक होत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!