Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025प्रभाग ५ मध्ये काँग्रेसला उत्साहवर्धक प्रतिसाद; विरोधकांमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रभाग ५ मध्ये काँग्रेसला उत्साहवर्धक प्रतिसाद; विरोधकांमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा

image_pdfimage_print

मूल

आगामी 2025 च्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ५ हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे. या प्रभागातून काँग्रेसने शिक्षित, युवा आणि समाजाभिमुख उमेदवार ऋतिक दिनेश गोयल यांना रिंगणात उतरवले असून स्थानिक पातळीवर त्यांना मिळत असलेला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सौ एकता प्रशांत समर्थ मैदानात आहेत. त्यांचे पती प्रशांत समर्थ हे अनेक वर्षे समाजकार्यात सक्रिय असून त्यांचा संपूर्ण शहरात भक्कम जनसंपर्क आहे. समर्थ दाम्पत्याची प्रतिमा आणि ऋतिक गोयल यांची तरुणाईतील लोकप्रियता यामुळे काँग्रेसच्या प्रचाराला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

जातीचा मुद्दा फसला – मतदारांमध्ये काँग्रेसच्या बाजूने कल

निवडणुकीत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाल्याची चर्चा असली तरी तो प्रयोग अपेक्षेप्रमाणे रंगला नाही.स्थानिक नागरिक “विकास आणि स्वच्छ प्रतिमा” याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभागात घराघरातील प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

विरोधकांमध्ये अंतर्गत विरोध; आर्थिक गैरव्यवहारांच्या चर्चा जोरात

विरोधी उमेदवारांविषयी त्यांच्या स्वतःच्या मंडळीतूनच नाराजी असल्याची चर्चा रंगत आहे.त्यांच्याच समाजातील काही नेत्यांनी विरोधी उमेदवारांवर “आर्थिक गैरव्यवहार” आणि “अनियमित कमिशनखोरी” केल्याच्या चर्चा केल्या जात असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. या आरोपांमुळे विरोधकांच्या प्रचारात गोंधळ निर्माण होत असून काही कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत असल्याचेही समजते.

काँग्रेसकडे मजबूत संघटना, तरुणाईचा ओढा

काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थ गटाचा जनसंपर्क, आणि तरुण मतदारांचा वाढता कल यामुळे प्रभाग ५ मध्ये काँग्रेसचा प्रचार वेग घेत आहे.महिला मतदारांकडूनही एकता समर्थ यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वातावरणात जाणवते.

स्थानिक राजकारणातील बदलते वातावरण, वाढता उत्साह आणि विरोधकांतील गोंधळ यामुळे प्रभाग ५ ची लढत अधिक रंगतदार झाली आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराची दिशा या प्रभागाचे राजकीय समीकरण काँग्रेस पक्षाकडे अधिक बळकट करेल, असे जाणकारांचे मत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!