Saturday, June 13, 2026
Homeउगवण क्षमतेची तपासणीमूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून बियाण्यांच्या उगवण चाचणी बाबत प्रात्यक्षिक... 

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून बियाण्यांच्या उगवण चाचणी बाबत प्रात्यक्षिक… 

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ( RAWE ) अंतर्गत पळसगाव (जाट) येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन 

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

          बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी व गोणपाट पद्धतीद्वारे उगवण याबाबतीत शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी महाविद्यालय, मूल च्या कृषी कन्या द्वारे  ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत पळसगाव (जाट) येथे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकरी व ग्रामस्थांना दर्जेदार बियाण्यांची निवड आणि पेरणीपूर्वी उगवण चाचणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या प्रात्यक्षिकात कृषी विद्यार्थिनी कु.स्वाक्षरी खोब्रागडे, कु.आचल मते, कु.वैष्णवी पंधरे, कु.दिव्या मोहुर्ले आणि कु. मुस्कान पांडे यांनी गोणपाट पद्धतीचा वापर करून बियाण्यांची उगवण कशी तपासावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. उगवण क्षमता तपासल्यामुळे व्यंग बियाण, अपुर्ण किंवा परिपक्व नसलेले बियाणे, रोगट बियाणे किंवा किड लागलेलं बियाणाचे विलिगिकरण करून नष्ट करण्याचा देखील सल्ला या वेळी देण्यात आला, जेणेकरून भविष्यात येणार्या पिकासंबधी समस्या उद्भवणार नाही आणि उगवन क्षमता तपासल्यामूळे योग्य बियाण्यांची निवड करता येते. पेरणीतील धोके कमी होतात आणि चांगले पीक उत्पादन मिळण्यास मदत होते, अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.

         कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रोत्साहनाने या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे आणि विषय विशेषतज्ञ डॉ. सुवर्णा नगराळे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या उगवण चाचणीचे महत्त्व जाणून घेतले व पेरणीपूर्वी अशा चाचण्या नियमितपणे करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा उपक्रम शेतकरी व कृषी विद्यार्थी यांच्यातील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!