Saturday, August 22, 2026
Homeमृदा परीक्षणकृषी महाविद्यालय मुल च्या कृषी कन्या नी राजगड येथे सांगितले माती परीक्षणाचे...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मुल च्या कृषी कन्या नी राजगड येथे सांगितले माती परीक्षणाचे महत्व

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी महाविद्यालय, मूल यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत राजगड येथे  29 मे 2026 ला शेतकऱ्यांसाठी मृदा नमुना संकलन व मृदा आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे तसेच शाश्वत शेतीसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
या उपक्रमात कृषी कन्या कु. शुभांगी बीसेन , कु.पीपल बनकर, कु.राणी बांते, कु.रुणाली भांडारकर, कु.नेहा भोयर.      यांनी राजगड “गावातील विविध शेतांमधून मृदा नमुने गोळा केले आणि मातीचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने कसे घ्यावेत, प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी त्यांची तयारी कशी करावी आणि मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली.

      कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रोत्साहनाने या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. एस. आर. मुन्नरवार, डॉ. ए. जे. इंगोले, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश नवघरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.
यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सामू (pH), सेंद्रिय कर्ब आणि क्षारता यांची अचूक माहिती मिळते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.
याशिवाय शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, मृदा धूप नियंत्रण याविषयीही माहिती देण्यात आली. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक शेतकऱ्यांनी नियमित मृदा परीक्षण करून शिफारशीनुसार खत व्यवस्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा उपक्रम शेतकरी व कृषी विद्यार्थी यांच्यातील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणारा व पर्यावरणपूरक शेतीसाठी प्रेरणादायी ठरला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!