Saturday, August 22, 2026
Homeविश्व महिला दिवसशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

मूल येथील शूरवी महिला महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूरचे सचिव  श्री.राजेश्वर सुरावार यांनी भूषवले. कार्यक्रमाला पोलीस उप निरीक्षक वर्षा नैताम प्रमुख मार्गदर्शीका म्हणून लाभल्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. रजनी झाडे, मानवाधिकार अध्यक्षा, चंद्रपूर तसेच कार्यकारी प्राचार्या स. प्रा. डॉ. मीनाक्षी राईंचवार, स. प्रा. आशिष आष्टनकर व स. प्रा. सौरभ तरारे मंचावर उपस्थित होते.
वर्षा नैताम यांनी महिला सुरक्षेवर मार्गदर्शन करताना महिलांवर व मुलींवर होणारे अत्याचार, त्याबाबतची जागरूकता आणि अत्याचाराविरुद्धच्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. महिला सुरक्षिततेचे उपाय तसेच करीअर मार्गदर्शन अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
कु. ज्ञानेश्वरी लेंझे व कु. धनश्री नेवारे या विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
प्रयोगशाळा सहाय्यक कु. टीना उरकुडे, स. प्रा. तनुश्री आक्केवार, स. प्रा. नेहा नेरल यांनीही विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
स. प्रा. डॉ. मीनाक्षी राईंचवार यांनी विनाशाच्या गर्तेकडे वेगाने जाणाऱ्या समाजाची धुरा स्त्रियांनी स्वतः हातात कशी घ्यावी यासंबधी मार्गदर्शन केले. कु. स्वीटी चाटारे व स. प्रा. रुपाली वाढई यांनी महिलांवरील सुंदर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांच्या विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश्वर सुरावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांच्या कर्तुत्वाचा इतिहास विद्यार्थिनींनी मनापासून अभ्यासला तरच आजच्या विद्यार्थिनी कर्तुत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करतील असा महत्वपूर्ण संदेश देऊन जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. प्रा. सौरभ तरारे यांनी केले. सूत्रसंचालन स. प्रा. वैष्णवी मांढरे यांनी केले, तर बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स. प्रा. प्रफुल्ल चौथे यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!