Thursday, October 22, 2026
Homeपदग्रहण सोहळाजे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

जे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.

image_pdfimage_print

मूल

जेसीआय मूल चा पदग्रहण 2026 समारंभ नुकताच हॉटेल रानसंपन्न येथे थाटात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून नगराध्यक्षा एकता समर्थ उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून झोन 3 चे झोन प्रेसिडेंट जेएफडी सौरव गटाणी व जेएफडी ज्ञानेश कचर्लावार हे होते.

नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी पदग्रहण सोहळ्याचे उदघाटन केल्यानंतर मावळते अध्यक्ष जेसी आशिष उधवानी यांना 2025 मध्ये केलेल्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गत वषींच्या कार्याचा लेखाजोखा मावळते अध्यक्ष जेसी आशिष उधवानी यांनी सादर केल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष जेसी जय संजय येरोजवार यांना शपथ देऊन पदग्रहण सोहळ्याची सुरवात केली.

नवनियुक्त अध्यक्ष जेसी जय संजय येरोजवार यांनी नवनियुक्त सचिव जेसी अनिकेत बिरेवार व 2026 चे कार्यकारी मंडळास शपथ दिली.


शपथविधी सोहळ्याच्या उदघाटक नगराध्यक्षा ऐकता समर्थ,यांनी जेसी च्या कार्याचे कौतुक केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. या उदघाटन सोहळ्याचे यशस्वीतेसाठी फाऊंडर अध्यक्ष जेसी. आशिष गोयल, पुर्व अध्यक्ष जेसी प्रणव वैरागडे, जेसी किशोर गोगुलवार यांनी परिश्रम घेतले.

या पदग्रहण सोहळ्यात जेएसी संजय येरोजवार, विभागीय अध्यक्ष जेएसी निलेश रॉय, जेएसी अविनाश गरपल्लीवार, जेसी. मधुकर शेंडे, जेसी. अनिल बिरेवार यांचेसह पत्रकार बांधव व शुभेच्छुक मोठया संख्येने उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्याचे संचालन जेसी निलय गावतुरे यांनी केले. व आभार जेसी. प्रज्वल हांडेकर यांनी मानले

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!