Sunday, April 19, 2026
Homeडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

आज १४|०४|२०२६ रोजी शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यास अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता, जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि विषमता याविरुद्ध कठोर लढा दिला. त्यांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्व देत वंचित आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित लोकशाही व्यवस्था दिली. त्यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशातून अनेकांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.
त्यांच्या कार्याची माहिती आणि विचारांचे महत्त्व महाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांनी विद्यार्थिनींना सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना डॉ. आंबेडकरांच्या आदर्शांचा अंगीकार करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!