Thursday, August 20, 2026
Homeनशामुक्त अभियानमुल येथील सुभाष उच्च प्राथमिक शाळा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा महा अभियानांतर्गत व्यसनमुक्ती...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील सुभाष उच्च प्राथमिक शाळा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा महा अभियानांतर्गत व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

मुल येथील सुभाष उच्च प्राथमिक शाळा येथे 11 ऑगस्ट 2026 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मूल च्या वतीने नशा मुक्ती प्रतिज्ञा महाभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते.
या कार्यक्रमांमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मूल च्या आदरणीय दिपा दीदी यांनी, विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय, त्याचे वाईट परिणाम आणि त्यापासून सुटका या संबंधात अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. मोबाईलच्या व्यसनापासून ते दारू, गुटखा, तंबाखू आणि इतर अमली पदार्थ याबाबत उदाहरणा सहित विद्यार्थ्यांना अतिशय सहज व सोप्या भाषेमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. मनाची एकाग्रता वाढवून अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष घालून आपण आपले जीवन यशस्वी कसे करायचे हे प्रात्यक्षिका सह समजावून सांगितले. याप्रसंगी उपस्थित साधक सुरेश रायकंटीवार यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना नशा विरोधी प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश जगताप यांनी केले तर संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवार यांनी केले, आभार प्रदर्शन श्री राहुल मुंगमोडे यांनी केले. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुलच्या सौ निर्मलाताई लोणारे, शाळेचे पदवीधर शिक्षक श्री राजू गेडाम श्री योगेश पुल्लकवार, कु. रीना मसराम, सौ. संध्या आभारे, श्री संकेत जाधव उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!