Saturday, June 13, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रममुल येथील कृषी महाविद्यालयात MPSC ( सरळ सेवा भरती ) परीक्षेच्या तयारीसाठी...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयात MPSC ( सरळ सेवा भरती ) परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी योग्य दिशा मिळावी तसेच शासकीय सेवेमध्ये करिअर घडविण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच अंतर्गत कृषि महाविद्यालय, मुल येथे सोमवार, दि. ८ जून, २०२६ रोजी “एमपीएससी परीक्षा (सरळ सेवा भरती) तयारी” या विषयावर ११ वे विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कृषी महाविद्यालय मुलच्या माजी विद्यार्थिनी तसेच सध्या मूल पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कु. मोहिनी भानारकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्हि. जी. अतकरे हे होते तसेच उद्यान विद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कु. मोहिनी भानारकर यांनी आपल्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा तयारीच्या प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडले. कृषी पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि चिकाटी यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी एमपीएससीच्या सरळ सेवा भरती परीक्षांची रचना, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासासाठी आवश्यक संदर्भग्रंथ, चालू घडामोडींचे महत्त्व, वेळेचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थीदशेपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यास यशाची शक्यता अधिक वाढते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन, लेखन आणि स्व-अभ्यासाची सवय लावण्याचा सल्ला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून स्पर्धा परीक्षांबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या अभ्यास पद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि मुलाखत प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक, डॉ. आर. पी. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान विषयांचे सखोल ज्ञान, चालू घडामोडींची जाण आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील एक प्रसंग रेखाटत, कृषी शिक्षणातून मिळणारे वैज्ञानिक ज्ञान हे स्पर्धा परीक्षांमध्येही कसे उपयुक्त ठरते हे त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्हि. जी. अतकरे यांनी अध्यक्षीय भाषणात, विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय सेवांमध्ये विविध संधी उपलब्ध असून त्या संधींचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहावे, कारण प्रत्येक अनुभव हा यशाकडे नेणारा टप्पा असतो, असे त्यांनी सांगितले. वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. गितांशु डिंकवार,  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच बी.एस्सी. (ऑनर्स) कृषीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास, करिअर घडणीस आणि स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण करण्यास हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!