Saturday, April 25, 2026
Homeस्वच्छता अभियानस्वच्छता ही सेवा......ध्यास स्वच्छतेचा पर्यावरण समतोल साधण्याचा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

स्वच्छता ही सेवा……ध्यास स्वच्छतेचा पर्यावरण समतोल साधण्याचा

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

 मुल येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे  यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाची सुरवात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे मे, २०१७ मध्ये केली. या अभियानाअंतर्गत एकूण ३ वनराई बंधारे, १००० च्या वर झाडे लावण्यात आली तर ६ अभ्यास परिसराची निर्मिती करण्यात आली .सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाच्या सर्वच विभागामध्ये सहयोगी अधिष्ठाता म्हणून असताना त्यांनी राबविला.

कृषी महाविद्यालय मुल येथे या उपक्रमाचा एकूण ५०० वा कार्यक्रम दिनांक २३/०४/२०२६ ला संपन्न झाला.मूल येथे १९ जून २०२५ ला पहिला स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला गेला तेथे सुद्धा आजपर्यंत ४४ कार्यक्रम राबवून १०० च्या वर झाडांची लागवड करून महाविद्यालयाचा तसेच प्रक्षत्राचा संपूर्ण परिसर नयन रम्य करण्यात आला, हे सांगताना डॉ. अतकरे यांनी याचे श्रेय सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणींला दिले आहे . कार्यस्थळावरील परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवणे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखणे तसेच बंधाऱ्याच्या माध्यमातून जल संवर्धन करणे हा या अभियान राबविण्यामागचा हेतू आहे. सदर उपक्रम विद्यापीठ सेवेमध्ये असेपर्यंत राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

या उपक्रमाअंतर्गत सुरवातीला डेअरी विभागातील दुधाळ गायींना पिण्याची मुबलक सोय होण्याकरिता १० लाख लिटर क्षमतेच्या गो जलधारा शेततळ्याची निर्मिती १ .५ लाख रुपये स्वतः योगदान देऊन करण्यात आली या मुळेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाकडे सतत १५ वर्ष पाठपुरावा करून सिमेंट बंधारा विद्यापीठ उपअभियंता (सिव्हिल) यापदाचा अतिरिक्त कार्यभार असताना मंजूर करून घेऊन मागच्या वर्षी तसेच उर्वरित या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आणि डेअरी विभागातील गुरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच सोबत वैरण पिका करीता संरक्षित ओलिताची सोय सुद्धा झाली. सदर उपक्रम महाविद्यालयात प्रत्येक आठवड्यामध्ये दर गुरवारी राबविण्यात येतो.सुटी असल्यास शुक्रवारी राबविण्यात येतो.या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!