Saturday, June 13, 2026
Homeपंतप्रधान नरेन्द्र मोदीभारतीय जनता पार्टी, मूल शहरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

भारतीय जनता पार्टी, मूल शहरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त पूजा-अर्चा

 

मूल  ( मेहुल मनियार )

       देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पार्टी, मूल शहरच्या वतीने श्री माता कन्यका परमेश्वर मंदिर, मूल येथे विशेष पूजा-अर्चा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी व जनकल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणारे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

      नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून देशाची जागतिक स्तरावर मान उंचावली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!