Saturday, June 13, 2026
Homeसत्कारमुल शहर भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा महासचिव नीलम निखिल सुरमवार यांचा सत्कार

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल शहर भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा महासचिव नीलम निखिल सुरमवार यांचा सत्कार

मूल ( मेहुल मनियार )

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महासचिव सौ. नीलम निखिल सुरमवार यांचा भारतीय जनता पार्टी मूल शहरच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा मूल शहरचे अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांनी नीलम सुरमवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या संघटनात्मक कार्याचा गौरव केला. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

सौ. नीलम सुरमवार यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा कार्यक्रम प्रमुख सौ. किरण कापगते, नगर सेविका सौ. अश्विनी निकोडे,मिडिया प्रमुख राकेश कोंडबत्तुलवार, सावली शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,मूल युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे,भाजपा उपाध्यक्ष मूल सुखदेव चौथाले, किशोर कापगते, रुपेश निकोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मूल शहरच्या वतीने करण्यात आले असून उपस्थितांनी सौ. नीलम निखिल सुरमवार यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!