Friday, August 21, 2026
Homeजागतिक मृदा दिनकृषी महाविद्यालय, मूल येथे जागतिक मृदा दिन साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय, मूल येथे जागतिक मृदा दिन साजरा

image_pdfimage_print

मूल ( चंद्रकांत मनियार )

       जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मूल येथील कृषी महाविद्यालय च्या मृदा विज्ञान विभागातर्फे ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावर्षीच्या थीमनुसार कार्यक्रमाची सुरुवात सहाव्या सत्रातील विद्यार्थिनी मोनाली हत्तीमारे हिने काढलेल्या आकर्षक रांगोळीने करण्यात आली.
मृदा दिनानिमित्त महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मातीचे महत्त्व, शाश्वत माती व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब, मातीचा होणारा ऱ्हास, त्याची कारणे आणि उपाययोजना याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मातीची रचना, संवर्धन तंत्रे आणि अन्न उत्पादनावर होणारा परिणाम याविषयीचे ज्ञान दाखवत विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम पारितोषिक : कु. करुणा साहू
• द्वितीय पारितोषिक : कु.मुस्कान पांडे व महारुख शेख
• तृतीय पारितोषिक : वृषभ मापारी व राहुल नागरे
विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे आणि डॉ. गजभिये यांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात, पहिल्या सत्रातील भावना चरपे व रुद्र कोकेवर, तसेच सहाव्या सत्रातील स्नेहल भोयर व दिव्या मोहुर्ले यांनी जागतिक मृदा दिनाच्या महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मृदा संवर्धनाविषयीची जाणीव आणि आपली भूमिका याबाबत विचार मांडण्याची संधी मिळाली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी मातीची शाश्वतता, मृदेमध्ये होणारे प्रतिकूल बदल कमी करण्याच्या उपाययोजना, जमिनीची होणारी धूप आणि तिच्यावर नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन अवलंबण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. रमाकांत गजभिये,) यांनी मातीच्या गैरवापरामुळे घटणारी सुपीकता याविषयी माहिती देत कूपनलिका खोदणे व विटभट्टी बंद करणे यांसारख्या उपाययोजना सुचवल्या. त्यांनी “माती अडवा – माती जिरवा” असा प्रभावी संदेशही विद्यार्थ्यांना दिला.

      सहायक प्राध्यापक ( मृदा विज्ञान ) डॉ. विशाखा डोंगरे  यांनी सद्यस्थितीत वाढत असलेला मातीचा ऱ्हास, तसेच Food and Agriculture Organization (FAO) सुचवत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. तसेच यावर्षीच्या थीम “निरोगी माती, सुदृढ शहरे” याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून मृदा दिनाचे महत्त्व पटवून दिले.यावेळी सहायक संचालक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ गीतांशु डिंकवार ह्या सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होत्या.
जागतिक मृदा दिन कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्राध्यापक नागेश नवघरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सहाव्या सत्रातील विद्यार्थिनी कु.राणी बांते हिने केले, तर आभार प्रदर्शन समृद्धी दाडगेलवार हिने केले.

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!