Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मुल नगर परिषद निवडणूक २०२५: उमेदवारांसाठी तहसील कार्यालयात ‘हेल्प डेस्क’ सुरू
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल नगर परिषद निवडणूक २०२५: उमेदवारांसाठी तहसील कार्यालयात ‘हेल्प डेस्क’ सुरू

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक, 2025 च्या अनुषंगाने उमेदवारांना नामनिर्देशन भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे व नामनिर्देशन प्रक्रिया योग्य पध्दतीन व्हावे, यासाठी तहसिल कार्यालय, मुल येथे प्रभाग निहाय उमेदवार सहायता कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहे. उमेदवारी कक्ष प्रभारी अधिकारी म्हणून श्री. विजय पंडीले, नायब तहसिलदार, मुल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रभाग निहाय खालील कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्यास कोणत्याही अडचणी असल्यास उमेदवाराने सहायता कक्षाची मदत घ्यावी असे आव्हान तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी मृदुला मोरे यांनी केले आहे.

नेमून देण्यांत आलेले कार्य

नामनिर्देशनपत्र व शपथपत्र तसेच नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले सर्व कागदपत्र, नाहरकत प्रमाणपत्रांची प्रथम स्तरीय तपासणी करून छाननी शिट निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अवलोकनार्थ सादर करणे, तसेच उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्यास कोणत्याही अडचणी असल्यास उमेदवाराने सहायता करणे.
या साठी सहाय्यक अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती केल्याबद्दल तहसीलदार मृदुला मोरे यांनी दर्शविले आहे.
1. श्री. शशांक डांगे, विद्युत अभियंता, नगर परिषद, मुल
2. श्री. शिथिल हाडके, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, मुल
3. श्री. रोहित शास्त्रंकार, अ.का. तह. कार्या, मुल
4. श्री. महेश बाबळसुरे, म. सहा तह. कार्या, मुल
5. श्री. छत्रपती व्यहाडकर, म. सहा. उ.वि.अ. कार्या, मुल
6. श्री. खुशाल सहारे, क.लि. तहसिल कार्यालय, मुल
7. श्री. सचिन सुर्यवंशी, ग्राम म.अ. तहसिल कार्यालय, मुल
8. श्री. मंगेश गाडलेवार, ग्राम म.अ. तहसिल कार्यालय, मुल
9. श्री. प्रशांत वडस्कर, ग्राम म.अ. तहसिल कार्यालय, मुल

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!