Wednesday, October 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025कोट्यावधी खर्च करूनही मूल शहरातील पाणी प्रश्न कायम.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कोट्यावधी खर्च करूनही मूल शहरातील पाणी प्रश्न कायम.

image_pdfimage_print

निवडणूक प्रचारावेळी भाजपच्या उमेदवारांना मतदा्रांकडून विचारला जात आहे,प्रश्न !

मूल :

       शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवुन मूल येथे वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. भाजपानिष्ठ असलेल्या नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या 28 कोटीच्या योजने मधून शहर वासियांना चोवीस तास स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, पण चोवीस तास नाही तर, एक वेळे ला मुबलक पाणी नागरिकांना मिळत नाही,अशी नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे या  निवडणूकीच्या प्रचारावेळी गेलेल्या उमेदवारांना  महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून त्यांची चांगलीच कोंडी होत आहे.
जनतेची मागणी लक्षात घेऊन मूल शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान अभियाना अंतर्गत सन २०१९ मध्ये २८ कोटी ८८ लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मुल शहराला दररोज जवळपास ४० हजार लिटर पाण्याची गरज आहे. आता पाणी पुरवठ्याची ही व्याप्ती अडीच पट वाढली आहे.
मूल शहरात आज घडीला नळ धारकांची संख्या ५ हजारावर आहे. शहरातील काही भागात नळाला फार कमी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. यामुळे नगर परिषद प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये
प्रचंड असंतोष पसरला आहे. सध्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने मागील काळात सत्तेत असलेल्या माजी नगरसेवकासह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचाराच्या वेळी महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत पाणीपुरवठ्याच्या विषय चांगलाच गाजत आहे.

     पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती, तुरटी, ब्लिचिंग क्लोरीनसाठी, बोरवेल दुरुस्ती, साहित्य खरेदी व विज बिलावर वर्षापोटी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही वर्षाला लाखो रुपये पाणीकर वसूल करण्यात येतो, तरीही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही.

वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या शहरात चार पाण्याच्या टाकी आहेत. त्याची पाणी साठवणूक क्षमता २०.३ लाख लिटर एवढी आहे. जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता ६.५ दशलक्ष लिटर आहे. तरीही मूल शहराला पाण्याचां तुटवडा असून मुबलक पाणीपुरवठा होत नाही. 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!