Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025नाव "प्रशांत" : पण लाटांनी नौका बुडवणारा महासागर!
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नाव “प्रशांत” : पण लाटांनी नौका बुडवणारा महासागर!

image_pdfimage_print

मूल

नगरपरिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांना मिळणारे अभूतपूर्व जनसमर्थन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः त्यांचे पती प्रशांत समर्थ यांच्या आक्रमक जनसंपर्क मोहिमेमुळे संपूर्ण शहरात समर्थ दांपत्याची जोरदार हवा असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

आज शहराचा असा एकही कोपरा उरलेला नाही, जिथे प्रशांत समर्थ यांच्या कामांची, त्यांच्या जनसंपर्काची आणि एकता समर्थ यांच्या नेतृत्वाच्या चर्चा होत नाहीत. गल्लीपासून चौकापर्यंत, बाजारपेठेपासून वॉर्डापर्यंत एकताचं नाव आणि प्रशांत समर्थ यांचं कार्यकर्तृत्व लोकांच्या ओठांवर आहे.

एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांना सर्व स्तरांतून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून विरोधक चांगलेच दबावात आले आहेत. पराभवाची भीती त्यांना सतत सतावत असून, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या हालचालींत दिसून येत आहे. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो आहे, हे आता लपून राहिलेलं नाही.

“एक प्रशांत महासागर आहे आणि दुसरा प्रशांत समर्थ” अशी चर्चा शहरभर रंगू लागली असून, या निवडणुकीत समर्थ लाट सर्व विरोधकांना गाठून टाकेल, अशी ठाम भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आता या प्रचंड जनसमर्थनाचं रूपांतर 2 डिसेंबरला मतपेटीत कसं होतं, याकडे संपूर्ण मूल शहराचं लक्ष लागून आहे.

मात्र इतकं नक्की,आज मूलमध्ये शांत दिसणाऱ्या अनेक मनात अस्वस्थतेची वादळं उठू लागली आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!