Saturday, August 22, 2026
Homeवादविवाद स्पर्धाराज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेत चंद्रपूरच्या शांताराम विधी महाविद्यालयाची चमू विजेता
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेत चंद्रपूरच्या शांताराम विधी महाविद्यालयाची चमू विजेता

image_pdfimage_print

 

मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संलग्नित मूल येथील कर्मवीर महाविद्यालय येथे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा.कन्नमवार जयंती निमित्त “कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता खुंटत आहे” या विषयावर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.  शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष ॲड.अनिल वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन पर कार्यक्रमात मूल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ एकता प्रशांत समर्थ उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी केले. त्यांनी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजनाचा उद्देश, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश महाविद्यालयांनी हाती घेतलेले विविध उपक्रम यां बाबत सखोल माहिती दिली. तद्नंतर कार्यक्रमाच्या उद्घाटक एकता समर्थ यांनी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव व राज्य स्तरीय वाद- विवाद स्पर्धेचे उद्घाटन केले. मूल नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  नगर परिषद मूल महाविद्यालयाच्या विकासासाठी सोबत राहील असे आश्र्वासन दिले. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे सचिव शशिकांत धर्माधिकार, संस्थेचे संचालक  डॉ.राममोहन बोकारे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून विद्यार्थी उपस्थित झालेले होते. विषयाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने विद्यार्थ्यांनी आपले मते मांडली, व प्रेक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता खुंटत आहे का नाही यावर विचार करण्यासाठी भाग पाडले. स्पर्धेतील विषयाच्या बाजूने आपले विचार मांडणारा प्रेम नामदेव जरपोतवार (गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, पदव्युत्तर विभाग) याने प्रथम क्रमांक पटकाविला व द्वितीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थी मयूर गंगाधर हनवते यांनी मिळवला. विषयाच्या विरुद्ध बाजूने कर्मवीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सिद्धी माधव अलोणी हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर शांताराम विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील हर्षल दिलीप साळवे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. गुनानुक्रमे शांताराम विधी महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयाने सांघिक पारितोषिक मिळवले. या राज्यस्तरीय परीक्षेचे परीक्षण डॉ.गोकुळ कामडी, संजय कुंटावार आणि गंगाधर कुनघाडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी एस आगलावे व आभार प्रा.सागर मासीरकर यांनी मांडले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!