Friday, August 21, 2026
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

image_pdfimage_print

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

_दारुड्या बाप

बाप म्हंजे स्तंभ जीवनाचा अन पाठीचा कणा
काहींचे मात्र अगदीच भिन्न पाहिजे रोज पापड चणा
जिच्या डोक्यावर आहे साऱ्या संसाराचा भार
तीच माय खाते ह्या नशेडी बापाचा मार
दारू पिऊन बाप होतो रोज रात्री जंगली
दारुड्या बापाच्या त्रासापायी माय मात्र खंगली
दारूच्या तलबेपाई बाप घरातले भांडे तांदूळ विकतो
पोटाची तलब भागवून बाप दारात आडवा निजतो
दारू पेऊन पेऊन बापाची कातडी सारी सुकली
झाला बाजार संसाराचा पण बाटली नाही सुटली
कसा करावा मायेने हा असा दुभंगलेला संसार
रात्रंदिवस नशेत दारूच्या बापाला ना आचार ना विचार
नशीब हीन लेकरासी पाहून माय आसवे पुसते
बापाच्या या कर्माची फळे सारा घरदार भोगते
प्रत्येकाच्या आयुष्याच्या आधारस्तंभ बाप नसतो
बाप नावाच्या नात्यावर कोणी बाप अपवाद असतो

_ मुक्ता आगडे pk
मूल, चंद्रपूर

🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!