Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल..
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल..

image_pdfimage_print

मूल ( प्रा चंद्रकांत मनियार )

       मूल नगरपरिषद च्या निवडणुकी साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी द्वारा भव्य रॅलीचे आयोजनातुन शक्ती प्रदर्शन द्वारे नगराध्यक्ष व नगर सेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पत्रकारांना नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची ओळख व्हावी या हेतूने काँग्रेस कमिटी द्वारा काँग्रेस भवन येथे पत्र परिषद चे आयोजन करण्यात आले होते.
या पत्र परिषदेत तहसील अध्यक्ष गुरूदास गुरुनुले आणि शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी बोलतांना सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी सर्व उमेदवारांची चाचणी घेत जवळपास ६०-६५ उमेदवारांमधून २१जणांची त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत त्रिस्तरीय सर्वेक्षण करुन या उमेदवारांची निवड केली आहे, असे स्पष्ट केले. निवडणुकीत पक्षाने बहुतांश नवीन चेहरे समोर आणले असून नगराची झालेली दुरावस्था व बिघडलेली प्रशासकीय व्यवस्था प्राधान्याने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की,सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य होईल या हेतूने यावेळी उमेदवारी दिली असल्याबद्दल स्पष्ट केले. लवकरच आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत त्या दिवशी ह्या सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या प्रभागात काय समस्या आहे आणि त्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम काय असेल ह्याबाबत संवाद साधता येईल असे सांगितले.


ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचे सोबत पक्षश्रेष्ठी रितसर चर्चा करून त्यांची नाराजी दूर करतीलच असा आत्मविश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार उपस्थित होते. सर्व प्रथम या सर्वांनी आपला परिचय करून दिला.
पुढिल पत्रपरिषदेला आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करु त्यावेळी आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे स्पष्ट केले. या निवडणुकीत काँग्रेस पार्टी निश्चितच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!