Wednesday, October 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025"प्रशांत" महासागराचा सुनामीत भाजपा बुडाली: काँग्रेसचा ऐतिहासिक विजय
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

“प्रशांत” महासागराचा सुनामीत भाजपा बुडाली: काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

image_pdfimage_print

20 पैकी 18 जागा काँग्रेसकडे, नगराध्यक्ष पदही काँग्रेसच्या झोळीत! भाजपला मोठा धक्का!

 

मूल

नगर परिषदेच्या 2025 च्या निवडणुकीत, काँग्रेसचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसने अभूतपूर्व कामगिरी नोंदवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. नगरसेवकांच्या एकूण 20 जागांपैकी तब्बल 18 जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला, तर फक्त 2 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.

या ऐतिहासिक विजयासह नगराध्यक्ष पद देखील काँग्रेसच्या झोळीत गेले आहे. त्यामुळे मूलमध्ये काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

निवडणुकीतील प्रमुख स्पर्धेत कॉंग्रेसच्या एकता समर्थ यांनी भाजपच्या उमेदवार किरण कापगते यांचावर 2,081 मतांच्या प्रचंड आघाडीसह विजय मिळवला, तर भाजपचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून अपेक्षित कामगिरी दिसली नाही.

राजकीय चर्चेत असा सूर उमटत आहे की, प्रशांत समर्थ यांसारख्या कर्तबगार, जनाधार असलेल्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करणे ही भाजपची मोठी रणनीतिक चूक ठरली. त्याचेच फळ म्हणून मूल नगर परिषदेत भाजप जवळपास अदृश्य झाली आणि प्रशांत समर्थ यांच्या अनुपस्थितीनंतर भाजपच्या घसरगुंडीला वेग आला, अशी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया.

या निकालांमुळे क्षेत्राचे आमदार सुधीर मुंगटीवार यांनाही मोठा राजकीय धक्का बसला आहे, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

निवडणूक प्रचाराच्या काळात काँग्रेसने स्थानिक मुद्दे, विकासाचे दृष्टीकोन आणि संघटनेची भक्कम एकजूट यांवर भर दिला होता. त्या रणनीतीचे फलित आज मतपेट्यांतून स्पष्ट झाले.

काँग्रेसच्या विजयानंतर शहरात जल्लोष सुरू असून, समर्थकांनी फटाके फोडून, मिरवणुका काढून आनंद व्यक्त केला.पराभवानंतर आता परिस्थितीचे विश्लेषण करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!