Friday, October 23, 2026
Home12 वी परीक्षा फलमूल येथील माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, ची 100टक्के निकालाची...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, ची 100टक्के निकालाची परंपरा कायम

image_pdfimage_print

मूल (प्रा. चंद्रकांत मनियार )
महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल या महाविद्यालयाने यंदा १०० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या परीक्षेत कु. मयुरी चरनदास सतरे हिने 69.50% गुण प्राप्त करून प्रथम स्थान पटकाविले. तसेच कु. आर्यन प्रफुल मेश्राम हीने 68.17% गुण प्राप्त करून दुसरे स्थान व
  कु. जानवी शालिक वासेकर हिने 67.83% गुण मिळवून तिसरे स्थान मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊराव झाडे सर, मुख्याध्यापिका रीमा कांबळे, उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद सर, तसेच ज्युनियर कॉलेज प्रभारी, वर्गशिक्षक दुष्यंत गणवीर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सांगितले जाते की, विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक सत्र 2026–27 पासून या कनिष्ठ महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.
या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!