Saturday, June 13, 2026
Homeराष्ट्रीय सेवा योजनाकृषि महाविद्यालय, मूलच्या एन. एस. एस. च्या विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रसेवेचा...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय, मूलच्या एन. एस. एस. च्या विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रसेवेचा संदेश दिला

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल च्या वतीने सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना च्या विशेष शिबिराचे 3 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान राजगड येथे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता दिंडी, महिला सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंधासाठी समाजप्रबोधन, रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती, पथनाट्य सादरीकरण, सकस आहाराविषयी मार्गदर्शन तसेच गावकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर (ब्लड प्रेशर, डायबिटीज, रक्तगट व रक्तक्षय/अ‍ॅनिमिया) इ. कार्यक्रम आयोजित केले, या शिबिरात एकूण ११६ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पशुवैद्यकीय शिबिरामध्ये जनावरांची तपासणी व उपचार (एकूण ४२) करण्यात आले. याशिवाय ग्राममूल्यांकनासाठी माहिती संकलन, असंसर्गजन्य रोगांविषयी जनजागृती, विद्यापीठाच्या नवीन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार, गावकऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, कृषि क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाबाबत जागरूकता, गटांना रोजगार निर्मितीविषयी माहिती देणे, ‘पाणी अडवा–पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत ७५ पोत्यांचा वापर करून पाटबंधारे बांधणे, गावामध्ये शोषखड्डे व पाझर खड्डे तयार करण्याबाबत मार्गदर्शन, माती परीक्षणासाठी माती नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक तसेच पडीत जमिनीवर फळबाग लागवड करण्यात आली.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार, यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन पार पडले. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कृषि महाविद्यालय, मुल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी थोर पुरुष व संतांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकत आदर्श गाव राजगडसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. उपसरपंच चंदूपाटील मारकवार यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अपयशाला न घाबरता सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा संदेश दिला. यावेळी डॉ. रमाकांत गजभिये यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.
महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. किरण बोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात कुटुंब सुरळीत चालण्यासाठी महिलांमध्ये चांगल्या सवयी असणे आवश्यक असून, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. दीपक देशपांडे यांनी “राष्ट्राय स्वाहा” म्हणजे राष्ट्राला समर्पित कार्य या संकल्पनेवर प्रकाश टाकत, ग्राहक म्हणून होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांशी थेट संपर्क येणार असून, शेतकरी व ग्रामस्थांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रमदानातून गादीवाफा तयार करून त्यावर टोमॅटो, वांगी, कोबी व फ्लॉवर या पिकांची रोपवाटिका तयार करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोपीय कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सात दिवसीय विशेष शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी जीवनातील शिस्त, आत्मनिर्भरता, परस्पर सहकार्याची भावना तसेच समूहात कार्य करण्याचे महत्त्व यांसारख्या अनेक गोष्टी आत्मसात केल्याचे त्यांनी सांगितले. या सत्रात मानसी गुरनुले, राहुल चिखलोंडे, किरण बोरकर, श्रीराम धनजोडे व गणिका बुधे यांनी आपले अनुभव मांडले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी सहकार्य, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असे सांगितले. विजय घोंगे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. रमाकांत गजभिये तसेच डॉ. गितांशु डिंकवार (सहाय्यक विद्यार्थी कल्याण अधिकारी, उपस्थित होते. तसेच सौ. मंजुषा कुंभमवार, ग्रामसेवक, राजगड यांचीही उपस्थिती होती. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन चैताली बेलेकर व राणी बांते या विद्यार्थिनी केले व आभारप्रदर्शन बलवीर जुनगरी यांनी केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!