Thursday, August 20, 2026
Homeनगर परिषद निवडणूकमूल नगरपरिषद : सभापतीपदांचा फैसला; पाच विभागांना नवे नेतृत्व
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगरपरिषद : सभापतीपदांचा फैसला; पाच विभागांना नवे नेतृत्व

image_pdfimage_print

मूल

नगरपरिषदेत बहुप्रतिक्षित सभापतीपदाचा निर्णय अखेर जाहीर झाला असून, एकूण सहा नगरसेवकांना विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. या घोषणेमुळे नगरपरिषदेत समाधानाचे वातावरण असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घोषित नियुक्त्यांनुसार प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक तसेच उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांच्याकडे आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक प्रशांत समर्थ यांची बांधकाम विभागाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विलास कागदेलवार यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे सभापतीपद, तर याच प्रभागातील नगरसेविका लीना फुलझेले यांची शिक्षण विभागाच्या सभापतीपदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका नलिनी आडपवार यांच्यावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तसेच प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका समीक्षा कडस्कर यांची महिला व बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी काम पाहिले. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडली.

यंदा झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. नगराध्यक्ष पदावर एकता प्रशांत समर्थ यांनी दणदणीत विजय मिळवला असून, राकेश रत्नावार यांची गटनेता व उपाध्यक्षपदी निवड झाली होती. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून गुलाब खान पठाण व बंडू गुरुनुले यांची निवड करण्यात आली आहे.

सभापतीपदांची घोषणा होताच संबंधित पदाधिकारी व नगरसेवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून, या नव्या टीमकडून मूल शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!