Wednesday, October 21, 2026
Homeअभियंता दिनमूल येथील कर्मवीर महाविद्यालय आणि महावितरण विभागा च्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कर्मवीर महाविद्यालय आणि महावितरण विभागा च्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मुल येथील राष्ट्रीय सेवा योजना +2 आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), मुल यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत व हरित ऊर्जा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विजय राठोड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, मुल, तसेच विनायक चव्हाण, सहाय्यक अभियंता, मुल आणि पंकज उजवणे, सहाय्यक अभियंता, मुल उपस्थित होते.  कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल बोधे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी विजेचा योग्य वापर आणि ऊर्जाबचतीचे महत्त्व अधोरेखित केले. दैनंदिन जीवनात विजेचा अनावश्यक वापर टाळणे, विद्युत उपकरणांचा गरजेनुसार वापर करणे आणि उपलब्ध ऊर्जेची बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील ऊर्जा गरजा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीची सवय स्वतः अंगीकारून समाजामध्येही त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. उपकार्यकारी अभियंता विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. विजेचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे, विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे तसेच ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विद्युत सुरक्षा व ऊर्जाबचतीची शपथ दिली.

सहाय्यक अभियंता विनायक चव्हाण यांनी हरित ऊर्जेची संकल्पना, सौरऊर्जा, अक्षय ऊर्जा स्रोत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी सौरऊर्जा व इतर अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सहाय्यक अभियंता पंकज उजवणे यांनी विद्युत क्षेत्रातील विविध बाबींवर मार्गदर्शन करताना विजेचा सुरक्षित, कार्यक्षम आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. विद्युत उपकरणांचा योग्य वापर, ऊर्जा बचत आणि विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अनिल शेलेकर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना “वीज वाचवा, ऊर्जा वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा” असा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!