Wednesday, October 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ एकता समर्थ यांची प्रचार मोहीम आघाडीवर
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ एकता समर्थ यांची प्रचार मोहीम आघाडीवर

image_pdfimage_print

 

मूल—

       2 डिसेंबरला होऊ घातलेल्या मूल नगरपरिषद निवडणूक साठी काँग्रेस, भाजपा,शिवसेना,बहुजन समाज पार्टी तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात खरा संघर्ष असून प्रत्येक उमेदवारांचा प्रचार अत्यंत वेगाने सुरु आहे. तरीसुद्धा शहरातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार तसेच प्रदेश कार्यकारिणीचे महासचिव संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वामध्ये प्रचाराला गती देण्यात आली आहे. डोअर टू डोअर प्रचार मोहीम सुरू आहे. प्रभागनिहाय संपर्क मोहीम आणि संघटन बळकटीकरणाला वेग आला आहे.
या निवडणुकीत राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ यांसह युवा नेतृत्व म्हणून मोठा गट काँग्रेसतर्फे मैदानात उतरवला आहे. शहरातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणारे आणि स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले युवक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडले जात आहेत. ऋत्विक गोयल, राहुल प्रेमलवार, विवेक मुत्यालवार, अशोक येरमे, मिथुन (नितीन) गद्देवार, अतुल गोवर्धन, विलास कागदेलवार, तुकाराम गुरूनूले, लीना फुलझेले, समिक्षा कडस्कर, ज्योती चटारे, काजल धारणे, पायल महाडोळे, उज्ज्वला मडावी, शालू शेरकी, भारती मेश्राम, नलिनी आडपवार, सुशिला खोब्रागडे हे नगर सेवक म्हणून निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसच्या या उमेदवारांना मतदार निश्चितच साथ देईल अशी चर्चा आहे.
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने सौ. एकता प्रशांत समर्थ यांना निवडणुकीत उतरविले आहे, तर नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती असलेले प्रशांत समर्थ प्रभाग १ मधून प्रचारात चांगलीच आघाडी घेत आहेत. शहरातील विविध प्रश्नांमध्ये त्यांची सततची उपस्थिती आणि सामाजिक सहभागामुळे हे दाम्पत्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यांचा विजय अटळ असल्याची चर्चा मूल शहरात अगदी जोरात रंगली आहे.
निवडणुकीच्या या परिस्थितीत शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांकडून रणनीती आखली जात असून प्रचार मोहिमेला वेग दिला जात आहे . स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाची दिशा या पार्श्वभूमीवर येऊ घातलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!