Wednesday, October 21, 2026
Homeपीक विमापीक विमा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, तूर...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

पीक विमा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांना संरक्षण

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील जोखीम दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) महत्त्वाची ठरत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, अवेळी पाऊस, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. खरीप हंगाम २०२६ साठी चंद्रपूर जिल्ह्यातील अधिसूचित पिकांचे विमा दर व संरक्षित रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
*महत्त्वाचे* : खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर केलेले विमा दर
अ. क्र. पीक विमा संरक्षित रक्कम (₹/हे.) एकूण विमा हप्ता (₹) शेतकरी हिस्सा (₹) केंद्र अनुदान (₹) राज्य अनुदान (₹)*
१ भात (तांदूळ) ६५,000 १,३00 १,३00 0 0
२ ज्वारी ३३,000 ३३0 ३३0 0 0
३ सोयाबीन ६२,५00  ३,१२५  १,२५0 ९३७.५0  ९३७.५0
४ तूर ४७,000, २,३५0, ९४0,  ७०५,  ७०५
५ कापूस ६५,000, १,३00, १,३00 
सोयाबीन व तूर उत्पादकांना अधिक दिलासा
सोयाबीन आणि तूर या पिकांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विमा हप्त्यावर अनुदान दिले जाणार आहे. सोयाबीनसाठी शेतकऱ्याला ₹ १,२५0 भरावे लागतील, तर उर्वरित ₹ १,८७५ शासनाकडून दिले जाईल. तूर पिकासाठी शेतकरी हिस्सा ₹ ९४0 असून उर्वरित ₹ १,४१0 शासनाकडून भरले जाईल.
पीक विमा म्हणजे काय?
पीक विमा म्हणजे नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल, कीड, रोग तसेच इतर मान्य जोखमींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना होय.
कोणत्या नुकसानीला संरक्षण?
दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, कीड, रोग, गारपीट, ढगफुटी, शेतात पाणी साचणे तसेच कापणीनंतर अवेळी पावसामुळे झालेले नुकसान यासाठीही काही अटींनुसार संरक्षण दिले जाते.
ई-पीक पाहणी अत्यावश्यक
मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करून शेतातील प्रत्यक्ष पिकाची नोंद सातबाऱ्यावर करणे आवश्यक आहे.
नुकसान झाल्यास ७२ तासांत माहिती द्या
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत Crop Insurance मोबाईल ॲप, टोल-फ्री क्रमांक 14447 किंवा संबंधित कृषि कार्यालयामार्फत माहिती द्यावी.
आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा स्वयंघोषणापत्र आणि शासनाने नमूद केलेली इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
कृषि विभागाचे आवाहन
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा ही केवळ नुकसान भरपाईची योजना नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा आधार असल्याचे कृषि विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी अधिसूचनेनुसार वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करून पीक विम्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रा. आशिष लाडे , कृषि विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालाय मूल, जिल्हा चंद्रपूर यांनी केले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!