Friday, August 21, 2026
Homeसन्मान सोहळाबँक ऑफ इंडियाच्या मूल शाखेतर्फे शेतकरी सन्मान व बचत गट सोहळा संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बँक ऑफ इंडियाच्या मूल शाखेतर्फे शेतकरी सन्मान व बचत गट सोहळा संपन्न

image_pdfimage_print

  मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        मूल येथील बँक ऑफ इंडिया, शाखेत शेतकरी सन्मान व बचत गट गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ६ महिला बचत गटांचा तसेच १० प्रगतिशील शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखा प्रबंधक श्री. उदय इसासरे यांनी शेतकरी व महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून बँक त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध आर्थिक योजना व कर्जसुविधा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी व बचत गटांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात सत्कारमूर्ती शेतकरी श्री. आनंदराव शेंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपले अमूल्य अनुभव सांगितले. तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व, आधुनिक शेतीतील संधी आणि सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमास कृषी अधिकारी श्री. द्रोहित धकाते, अधिकारी कु. प्रणाली गजभिये, शाखेतील इतर कर्मचारी, बँक मित्र, बँक सखी तसेच विविध महिला बचत गटांच्या सदस्यांची व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी व महिला बचत गटांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!