Friday, August 21, 2026
Homeनशामुक्त अभियानकर्मवीर महाविद्यालयात नशामुक्त युवा अभियान संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालयात नशामुक्त युवा अभियान संपन्न

image_pdfimage_print

मूल  ( मेहुल मनियार )

     शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय,मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि पोलीस स्टेशन मूल यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त युवा अभियान २०२६” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मान. सत्यजित आमले साहेब, पोलीस निरीक्षक मान. विजय राठोड, पोलीस स्टेशन मुल, हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, मान. कुंभरे साहेब आणि मान. नरेश कोडापे उपस्थित होते.

      प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तरुणाई ही देशाची शक्ती असून व्यसनाधीनतेमुळे तिच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच समाजातही नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी मान. सत्यजित आमले यांनी नशामुक्तीच्या विषयावर मार्गदर्शन करताना व्यसनांचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहल किंवा मित्रांच्या दबावातून होते; मात्र त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कला आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये स्वतःला सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. दिनेश बनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात नशामुक्त समाज निर्माण करण्यामध्ये युवकांची भूमिका अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या मित्रपरिवारात आणि समाजात जनजागृती निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले.
मान. नरेश कोडापे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेल संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी लिंक व संदेशांपासून सावध राहण्याची गरज तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक मान. विजय राठोड यांनीही नशामुक्तीच्या विषयावर मार्गदर्शन करताना व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पोलीस प्रशासनासोबतच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नशामुक्तीची सामूहिक शपथ दिली. निरोगी, व्यसनमुक्त आणि जबाबदार समाज निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. राहुल बोधे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!