Thursday, August 20, 2026
Homeरंगनाथन जयंतीशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा

image_pdfimage_print
  • मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

         दि. १२ ऑगस्ट २०२६, रोजी मूल येथील शूरवी महिला महाविद्यालय, येथे भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक आणि प्रख्यात ग्रंथालयशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मजयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

राष्ट्रीय ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयाचा नियमित वापर वाढविणे आणि विविध ज्ञानस्रोतांचा उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींनी नियमित वाचनाची सवय जोपासावी आणि ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तके, संदर्भग्रंथ व नियतकालिकांचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिचर कु. स्वाती उत्तूरवार तसेच विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!