Saturday, August 22, 2026
Homeबिरसा मुंडा जयंतीनवभारत विद्यालय मुल येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नवभारत विद्यालय मुल येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

image_pdfimage_print

 

मूल ( मेहुल मनियार )

  नवभारत विद्यालय मुल येथे 15 नोव्हेंबर ला जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे, होते व प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, जेष्ठ शिक्षक विजय मेश्राम, प्रतिमा उमक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आले.  विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर वेशभूषेत सुंदर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या शिक्षिका कु. माधुरी तलांडे यांनी केले.
बिरसा मुंडा हे एक आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ‘उलगुलान’नावाची चळवळ सुरू केली. त्यांनी आदिवासींना त्यांच्या पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेचे पालन करण्यास प्रोत्साहित केले आणि लोकांना एका नव्या आदिवासी धार्मिक चळवळीची ओळख करून दिली. बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन मिशनरी आणि धर्मांतराच्या कारवायांविरुद्ध एक मोठी धार्मिक चळवळ उभारली. त्यांनी लोकांना त्यांच्या पारंपरिक आदिवासी श्रद्धा आणि परंपरेचे पालन करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या शिकवणी आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन आदिवासी लोक त्यांना ‘धरती आबा’ म्हणजेच ‘पृथ्वीचे पिता’ म्हणू लागले.बिरसा मुंडा एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक बनले. ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षात त्यांनी आदिवासी लोकांना एकत्र केले आणि त्यांनी ब्रिटिशांना कडवी झुंज दिली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त (१५ नोव्हेंबर) भारत सरकारने या दिवसाला ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून घोषित केले आहे, जे आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु. पुजा कारडे हिने केले तर उपस्थितांचे आभार कु. बनकर हिने मानले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री विकास मोडक, निलेश माथनकर, भारत सलाम,राजू बोढे, विजय निखारे,चैतन्य पुपलवार, पुनमचंद वाळके, उदयचंद चौधरी, सुनिल चौधरी, ताराचंद निमसरकार, कु .दिपा गोंगल तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!