Thursday, August 20, 2026
Homeअभ्यास भेटमुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची अभ्यास भेट
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची अभ्यास भेट

image_pdfimage_print

सिंदेवाही येथील सहकारी बँकेच्या भेटीवर कृषि महाविद्यालय, मूल च्या विद्यार्थिनी —- बँक व्यवस्थापकांचे मोलाचे सहकार्य–

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला संलग्नित मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत सिंदेवाही येथील विद्यार्थिनींनी आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा सिंदेवाही येथे अभ्यास भेट दिली. कृषी महाविद्यालय मुल चे सहयोगी अधिष्ठाता यांच्या प्रेरणेतून व समन्वयक डॉ.आर. पी. गजभिये यांच्या मार्गदर्शनातून ही भेट घेण्यात आली

         या भेटीदरम्यान कु. भाग्यश्री घागी, कु. हिरल गोंगले, कु. प्रणाली गुरनुले, कु. मोनाली हातिमारे आणि कु. आचल कडस्कर या RAWE विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

      सिंदेवाही बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांनी विद्यार्थिनींना अत्यंत सहकार्याची व आपुलकीची वागणूक दिली. शेतीसाठी कर्ज योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा, ठेव योजना, तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती समजावून सांगितली. बँकेचे कामकाज, कर्ज वाटप प्रक्रिया, वसुली पद्धत याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी सहकारी बँकेची भूमिका महत्वाची आहे. भविष्यातील कृषी पदवीधरांनी बँकिंग प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे,” असे मत यावेळी व्यवस्थापकांनी व्यक्त केले.

विद्यार्थिनींनी बँकेच्या विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाज पाहिले व आपल्या शंका निरसन करून घेतल्या. बँक व्यवस्थापकांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन व सहकार्याची भावना वाखाणण्याजोगी होती, अशा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

RAWE कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेत बांधावर व शेतकऱ्यांशी निगडित संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या भेटीमुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून त्याचा उपयोग भविष्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नक्की होईल,

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!