Friday, August 21, 2026
Homeनिवेदनअल्पवयीन मुलींचे शोषण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा- प्रा किरण कापगते यांची भाजप...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

अल्पवयीन मुलींचे शोषण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा- प्रा किरण कापगते यांची भाजप शिष्टमंडळासमवेत मागणी

image_pdfimage_print

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कारवाईचे आश्वासन

मूल ( मेहुल मनियार )

       मुल येथील अल्पवयीन मुलींना फसवणाऱ्या नराधमांना पासको कायद्याच्या अंतर्गत अटक झाली , चौकशी सुरू आहे. सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद , निंदनीय, संस्कृतीला काळिमा फासणारा आहे, परिसरात जनमानसात प्रचंड चीड निर्माण झाली आहे, प्रकरण हे गंभीर असुन सदर प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर नराधमांना शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद करण्याचे निवेदन प्रा. सौ. किरण कापगते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार याना दिले, आमदार मुनगंटीवार यांनी मागणी अतिशय योग्य असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलून कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले,   निवेदन देतांना प्रा.किरण कापगते, महिला आघाडी मुल शहर अध्यक्ष श्रीमती मनीषा गांडलेवार, नगरसेविका प्राची आकेवार, अश्विनी निकोडे तसेच सौ किरण चौधरी , सौ रिना मसराम, आयेशा शेख व भाजप कार्यकर्त्या उपस्थित होत्या

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!