Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर निवडणुका लढविणार
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर निवडणुका लढविणार

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच नगरपरिषद व नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर केल्या असून राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले. मुल येथील इको गार्डन च्या रानवारा मध्ये आयोजित केलेल्या पत्र परिषदेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय कन्नावार यांनी ही माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल आणि गडचिरोली तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये ताकतीने लढण्याची पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय कन्नावार यांनी पत्रकारांना माहिती देतांना  पुढे स्पष्ट केले की, गडचिरोलीत मागील निवडणुकीत यश मिळाले होते. या निवडणुकीत सुद्धा यश मिळेल अशी आशा व्यक्त केली. राष्ट्रीय समाज पक्ष हा गोरगरीब, शोषित, पीडित,शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष साबीर शेख उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले की महायुती सोबत युती करणार नाही. मात्र महाआघाडीचा पर्याय खुला आहे. सध्या उमेदवारांची निवड झालेली नसली तरी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लवकरच यादी जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!