Friday, August 21, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठकमूल येथील कृषि महाविद्यालयाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चाळीसवी बैठक संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालयाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चाळीसवी बैठक संपन्न

image_pdfimage_print

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

मूल येथील कृषी महाविद्यालय अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची  चाळीस वी बैठक ३० मार्च, २०२६ सोमवार रोजी  मूल तालुक्यातील मौजा चितेगाव येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी चितेगाव येथील शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “उन्हाळी धान लागवड” आणि भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन* या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी  सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, कृषिपूरक व्यवसाय यावर भर दिला. उन्हाळी हंगामात घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची योग्य मशागत करणे, माती परीक्षण करणे, वेळेवर पेरणी, पिकांची नियमित पाहणी केल्यास कीड व रोग नियंत्रणात राहते, पाण्याचे योग्य नियोजन करणे, सेंदीय खतांचा वापर, गांडूळखत व जैविक घटक यामुळे जमिनीची सुपीकता कशी वाढते. यावर मार्गदर्शन केले.
कृषि विद्या विभाग चे सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वप्निल ठाकरे,  यांनी धान तसणीपासून कंपोस्ट किवा गांडूळखत निर्मिती करून धान पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी वापर करावा. तसेच धान लागवडी अगोदर बोरू लागवड करून चिखलणीच्या वेळी जमिनीत पुरल्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो. यावर मार्गदर्शन केले. कीटकशास्त्र विषयतज्ञ डॉ. भूषण ठाकरे यांनी कापूस व धान पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे तसेच ट्रायकोकार्ड आणि जैविक घटकांचा वापर करून कीड नियंत्रण करण्यावर भर दिला. उद्यानविद्या विषयतज्ञ, डॉ. शैलेंद्र कडू यांनी भाजीपाला व फळ पिकांसाठी योग्य खत व्यवस्थापन, सेंद्रिय घटकांचा वापर आणि एकात्मिक पिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कृषिविद्या विषयतज्ञ प्रा. देवानंद कुसुंबे यांनी गांडूळखत आणि गांडूळअर्क पाणी कसे बनवावे यावर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास एकुण २६ शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. देवानंद कुसुंबे यांनी मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!