Wednesday, October 21, 2026
Homeराष्ट्रीय सेवा योजनाआदर्श गाव राजगड येथे कृषि महाविद्यालय, मूल तर्फे राष्ट्रीय सेवा योजना...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आदर्श गाव राजगड येथे कृषि महाविद्यालय, मूल तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      मूल तालुक्यातील आदर्श गाव राजगड येथे कृषि महाविद्यालय, मूल द्वारा राष्ट्रीय सेवा योजनेचे 3 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि महाविद्यालय, मूल आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी राजगड येथे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विलास अतकरे, कृषि महाविद्यालय, मूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार, विस्तार अधिकारी (शिक्षण) या उद्घाटक म्हणून लाभल्या. तसेच राजगड चे सरपंच रविंद्र चौधरी, आणि उपसरपंच चंदू पाटील मारकवार, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी व प्रतिष्ठित गावकरी मंडळी तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   उद्घाटन पर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमाचे महत्त्व सांगत, “चांगली गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, मेहनतीशिवाय पर्याय नाही,” असे मत व्यक्त केले. मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. रविंद्र चौधरी  यांनी स्वयंसेवकांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. उपसरपंच श्री. चंदूपाटील मारकवार यांनी आपल्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अपयशाला न घाबरता सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचा संदेश दिला. विकासात्मक दृष्टीकोनातून आदर्श गाव घडविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. रमाकांत गजभिये, वरिष्ठ प्राध्यापक (उद्यानविद्या), कृषि महाविद्यालय, मूल यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडत, राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना या विशेष शिबिरात तत्परतेने सहभाग घेण्याचे आवाहन केले.
डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मुल यांनी अध्यक्षीय भाषणात थोर पुरुष व संतांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकत आदर्श गाव राजगडसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच शिबिरासाठी वेळेत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावचे सरपंच व उपसरपंच यांचे आभार मानले. या शिबिराअंतर्गत ग्रामस्वच्छता दिंडी, विविध विषयांवर जनजागृती, विद्यापीठाच्या नवीन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार, पथनाट्य सादरीकरण, आरोग्य तपासणी शिबिर, जनावरांचे लसीकरण तसेच गावकऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रा. से. यो. विशेष शिबीर उद्घाटनप्रसंगी राजगड रामपंचायत मार्फत सरपंच व उपसरपंचांच्या हस्ते जि. प. उच्च प्राथमिक शाळा, राजगड येथील विध्यार्थ्यांना सहा टॅब्लेट वितरीत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. घोंगे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान, यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आशीष लाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व आभारप्रदर्शन डॉ. सुवर्णा नगराळे, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र यांनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!