Friday, August 21, 2026
Homeप. जवाहरलाल नेहरू जयंतीबल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे बाल दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे बाल दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला

image_pdfimage_print

 

मुल ( मेहुल मनियार )

     बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून आणि बालकाचा आनंदाचा दिवस म्हणून विशेष महत्वाचा मानला जातो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या शैक्षणिक प्रभारी सौं दुर्गा कोटगले मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला दीपप्रज्वलन आणि माल्यर्पण करून करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य बोलीवार यांनी विध्यार्थ्यांना आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील महत्व आणि बालदीन याचे महत्व पटवून दिले. आपल्या लहानपणीतील गोष्टींना उजाळा देऊन विद्यार्थना मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी नृत्य, गाणी, नाट्यस्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यासारख्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थासाठी विशेष खेळ आणि संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विद्यार्थांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थना गोष्टी सांगून मनोरंजन केले तसेंच बालपनाच्या आठवणीना उजाळा दिला.
बालदिनाचा आनंद लुटत विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी हा दिवस स्मरणीय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जयस्वाल हिने केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!