Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025गोरगरिबांच्या हाकेला मदत करण्यासाठी धावून जाणारे “समर्थ दांपत्य !”
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

गोरगरिबांच्या हाकेला मदत करण्यासाठी धावून जाणारे “समर्थ दांपत्य !”

image_pdfimage_print

मतदारांमध्ये होत असलेली जोरदार चर्चा

मूल

मूल नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून मतदारांचा कल कोणाकडे झुकत आहे, याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ आणि त्यांचे पती प्रशांत समर्थ यांचे नांव आहे.शहरातील जनतेच्या अडचणीला तत्काळ प्रतिसाद देणे,  केव्हाही मदतीला धावून जाणे—यामुळे समर्थ दांपत्याने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
कधी मध्यरात्री आजारी नागरिकाला रुग्णालयात हलवणे, कधी अपघातस्थळी धाव घेऊन मदत करणे, तर कधी गरजू कुटुंबांच्या अडचणी स्वतः उभे राहून सोडवने अशा कामांमुळे “ काम करणारे नेतृत्व” अशी त्यांची प्रतिमा मजबूत झाली आहे.
एकता समर्थ यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रभागनिहाय जनसंपर्क मोहिमे ला गतीमान मिळत आहे. शहरातील तरुण, महिला, तसेच गोरगरिबांत त्यांच्या कामाची दखल घेतली जात आहे. विशेषतः गरजू कुटुंबांना मिळालेली त्यांच्या माध्यमातून मदत आणि विविध सामाजिक उपक्रमांत दाखवलेली सहभागाची वृत्ती यामुळे त्यांच्या नावाभोवती सकारात्मक चर्चा वाढत आहे.
मतदारांमध्ये वाढलेली चर्चा आणि समर्थ दांपत्याबद्दलचा वाढता विश्वास पाहता काँग्रेस पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याची चिन्हे अधिक स्पष्ट होत आहेत. मूल शहरातील परिवर्तनाच्या हाकेला आता नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!