Friday, August 21, 2026
Homeव्याख्यानबँकिंग क्षेत्रात करिअरच्या संधी.... कृषी महाविद्यालय मुल येथे अतिथी व्याख्यानाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअरच्या संधी…. कृषी महाविद्यालय मुल येथे अतिथी व्याख्यानाचे आयोजन

image_pdfimage_print

मुल ( प्रा चंद्रकांत मनियार)

मूल येथील कृषी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि स्पर्धा परीक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “General Banking Examination ची तयारी” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.       कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रा.डॉ. आर. पी. गजभिये, (उद्यानविद्या), प्रमुख वक्ते श्री. केतन दोडके, प्रबोधक अधिकारी (Probationary Officer), एस.बी.आय. मुख्य शाखा, चंद्रपूर तसेच घनश्याम डेकाटे, डेप्युटी मैनेजर, रिजनल ऑफिस हे प्रामुख्याने उपस्थित होते.       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. गितांशु डिंकवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण मृदा विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नागेश नवघरे यांनी केले.
श्री. घनश्याम डेकाटे यांनी बँकिंग परीक्षांबद्दल महत्वाचे मुद्दे सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ता श्री. दोडके यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व, वेळेचे व्यवस्थापन, विषयानुसार अभ्यासाचे नियोजन, तसेच आत्मविश्वास आणि सातत्य या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या घटकांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेची रचना, तयारीसाठी उपयुक्त साधने आणि ऑनलाइन संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत विविध प्रश्न विचारले.
डॉ. आर. पी. गजभिये यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, चुकीच्या सवयी सोडा आणि चिकाटीने अभ्यासाला लागा. विध्यार्थ्यानी एकच ध्येय ठेवायला हवे. ध्येय बदलले तर सर्व बदलत असते आणि अपेक्षित यश प्राप्त होत नाही. त्यांनी पुढे सांगितले कि, पुस्तकांमध्ये खूप ताकद आहे, त्यातून आत्मविश्वास वाढतो. तसेच त्यांनी “कूछ करणे के लिये जुनून चाहिये” ,“नो पेन, नो गेन” आणि “नॉट फेलुअर, बट लो एम इस क्राईम” असे सांगून विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना “शेती आणि बँकिंग क्षेत्र हे एकमेकांशी घट्टपणे जोडलेले असून कृषी क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनी वित्तीय साक्षरतेचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे” असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले कि, “जर शक्तिशाली व्हायचं असेल, तर शिक्षित व्हावं लागेल. यश हे आपल्या सावलीसारखं असतं — त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. जिथे प्रकाश असतो, तिथे सावली सुद्धा असते. जर आयुष्यात चांगलं व्हायचं असेल, तर चांगलं खाणे, चांगलं वागणे, चांगला विचार करणे.”.आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      या व्याख्यानाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व विध्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नागेश नवघरे यांनी केले. या व्याख्यानाला सर्वच सत्रातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांनी या सत्रातून अनेक उपयुक्त अध्ययन धोरणे आत्मसात केली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!