Saturday, August 22, 2026
Homeश्रम संस्कार छावनीसोमनाथ येथील शिबिरातून स्व. बाबा आमटे यांच्या कार्याला जवळून पाहण्याचा योग आला
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

सोमनाथ येथील शिबिरातून स्व. बाबा आमटे यांच्या कार्याला जवळून पाहण्याचा योग आला

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा मुल तालुक्यातील सोमनाथ स्व. बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत 57 वी श्रम संस्कार छावणी 16 मे ते 21 मे पर्यंत आयोजित आहे. या श्रमसंस्कार शिबिरात महाराष्ट्र, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश इत्यादी राज्यातून जवळपास 100 शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. रवींद्र नलगंटीवार यांच्या संयोजनात व इतर स्वयंसेवकाच्या सहकार्याने  सुरू असलेल्या या शिबिरातील काही शिबिरार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपली प्रतिक्रिया दिली. 

       वरोरा येथील सौं. जयश्री वैभव मांडवकर हिने सांगितले की, तिचे हे पहिले शिबिर आहे. या शिबिरातून सामाजिक कार्य, सेवा, मदत, शेती विषयक ज्ञान आणि श्रमाचे महत्त्व याबाबतीत माहिती मिळाल्याने भविष्यात समाजातील युवक युवतींना या विचाराद्वारे प्रोत्साहित करण्याचा मानस तिने बोलून दाखविला. सध्याच्या परिस्थितीत उन्हाचा तडाखा असताना सुद्धा, एकत्रपणे श्रमदान करताना कुठलाही थकवा जाणवत नाही, असे सांगितले.
बारामती येथील डेअरी इंडस्ट्रिज सोबत जुडलेले सुधीर अंबादास देवकाते यांनी त्यांचे हे प्रथम शिबिर असल्याबाबत सांगितले. स्वर्गीय बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याबाबत त्यांना बरीच माहिती असल्याने प्रत्यक्ष शिबिरात सहभागी होऊन त्यांचे कार्य जवळून बघण्याचा योग आला, असे त्यांनी सांगितले. स्व. बाबांचे कार्य आम्हाला जीवनात प्रेरणा देत असते असे बोलून दाखविले.


संबलपुर (ओरिसा ) येथील कु. रश्मिता कलेत ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शिबिरामध्ये सहभागी झाली असल्याचे तिने सांगितले. तिने सांगितले की, संघटनेच्या कार्यासोबत ग्रामीण क्षेत्राशी तिचा संबंध असल्यामुळे या शिबिरात मिळालेली संधी आणि ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात ती नक्कीच करणार, असे बोलून दाखविले. या शिबिरात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असून शिबिरार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते, असे विशेष नमूद केले.
इंदापूर येथील रोहित भोसले यांनी सांगितले की, त्यांना दुसऱ्यांदा शिबिरात सहभागी होण्याचा योग आला. निस्वार्थपणे मित्रता निर्माण करणे, नातेसंबंध चे महत्व जाणणे आणि सामाजिक कार्य करण्याचे ज्ञान या शिबिरातून मिळाले. या शिबिरातून मिळालेल्या ज्ञान आणि संस्काराचा जीवनात निश्चितपणे उपयोग करणार असे सांगितले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!