Sunday, June 21, 2026
Homeगॅस सिलेंडर समस्यामूल मध्ये गॅस सिलिंडर एजंसी तात्काळ सुरू करा...मूल तालुका पत्रकार संघाची मागणी

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल मध्ये गॅस सिलिंडर एजंसी तात्काळ सुरू करा…मूल तालुका पत्रकार संघाची मागणी

पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

मूल ( मेहुल मनियार )

      स्थानिक शहरातील बंद असलेली एच पी गॅस सिलिंडर एजंसी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील तालुका पत्रकार संघाने पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे केली. गुरूवारी चंद्रपूर येथे मूल तालुका पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांची वन अकादमी येथे भेट घेतली.तसेच जिल्हाधिकारी वसूमना पंत यांना तात्काळ गॅस एजंसी सुरू करण्या बाबत एक निवेदन सादर केले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी मागणी बाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल.जनतेच्या हितासाठी पत्रकार संघाने केलेली मागणी अतिशय योग्य असून याबाबत प्रशासनाच्या वतीने यौग्य ती कार्यवाही जलदगतीने सुरू करण्यात येईल. असे शिष्टमंडळास आश्वासीत केले.मागिल ब-याच दिवसांपासून मूल येथील गॅस एजंसी बंद आहे.सावली आणि चिचपल्ली येथील गॅस एजंसीच्या भरोवश्यावर शहरातील ग्राहकांना सिलिंडर पुरविले जाते.परंतु,सिलिंडर वाटप करताना ग्राहकाची मागणी पूर्ण केल्या जात नाही.मध्यंतरीच्या काळामध्ये गॅस सिलिंडर साठी ग्राहकांना रांगेत मध्ये उभे राहावे लागले.सिलिंडर अभावी महिलांना मोठा फटका बसला.त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.त्यामुळे मूल मध्ये बंद असलेली गॅस सिलिंडर एजंसी तात्काळ सुरू करण्यात यावी.अन्यथा नवीन एजंसी दयावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. त्याला पालकमंत्री डॉ अशोक उईके आणि जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे शिष्टमंडळास सांगितले.

      जनहितासाठी मूल तालुका पत्रकार संघाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतूक पालकमंत्री डॉ.उईके यांनी केले.शिष्टमंडळामध्ये मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे ,सचिव विनायक रेकलवार,जेष्ट सदस्य चंद्रकांत मनियार,संजय पडोळे,गुरूदास गुरनूले,भोजराज गोवर्धन,रमेश माहूरपवार उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!