Thursday, October 22, 2026
Homeसावित्री बाईं फुले जयंतीनवभारत विद्यालय द्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नवभारत विद्यालय द्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

image_pdfimage_print

मूल:— ( मेहुल मनियार )

 शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवभारत विद्यालय मुल येथे 3 जानेवारी ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव झाडे व प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी , ज्येष्ठ शिक्षिका कु. प्रतिमा उमक , कु.दीपा गोंगल , कु.माधुरी तलांडे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीपप्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. सर्व शिक्षकवृंदाचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कु. तनश्री उपरीकर हिने केले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. वर्ग आठवी ची विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री चिंचोलकर हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकांकिका सादर केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई च्या अथक परिश्रमुळे स्त्रि शिक्षित झाल्याने देशाच्या विकासाला हातभार लागून देश प्रगतीपथावर जात आहे, असे सौ.भांडारकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अशोक झाडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समस्त भारतातील स्त्री शिक्षणाकरिता शिक्षणाचे द्वारे खुले करून स्त्रीमुक्तीचा लढा दिला. अहोरात्र परिश्रम घेऊन भारतातील पहिली शाळा 1 जानेवारी 1848 पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये काढली असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु.तेजश्री शेरकी आणि अक्षरा चौधरी हिने केले. उपस्थितांचे आभार कु.रिद्धी गौरकर हिने मानले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!