Friday, June 5, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025लोकांच्या विश्वासावर उभं राहिलेलं नेतृत्व "आयात" नसतं—हाच मूलचा स्वाभिमान!!!

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

लोकांच्या विश्वासावर उभं राहिलेलं नेतृत्व “आयात” नसतं—हाच मूलचा स्वाभिमान!!!

मूल

नगरपरिषद निवडणूक 2025 जवळ येत असून दोन्ही बाजूंनी आरोप–प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच पेटले आहे. प्रतिद्वंदी कडून “विपक्षाकडे नेतृत्व नाही म्हणून आयात उमेदवार उभे करावे लागले” अशी टीका होत असताना, काँग्रेसने या आरोपांना थेट आणि ठोस उत्तर दिले आहे.

काँग्रेसची यावर प्रतिक्रिया अली की,एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं ही भारतीय लोकशाहीतील सामान्य प्रक्रिया आहे. ज्यांचं कार्य, सामाजिक योगदान आणि लोकाधार आहे, अशा व्यक्तींना लोकांचा पाठिंबा मिळणं हे आयात नाही,तर लोकांचा कौल आहे.काँग्रेसने स्पष्ट केले की त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ एकता प्रशांत समर्थ आणि त्यांचे पती प्रशांत समर्थ यांचा नगरातील सामाजिक, शैक्षणिक, सेवा–कार्याचा पाय भक्कम आहे, आणि त्या कोणत्याही प्रकारे “आयात” श्रेणीतील नसून, लोकांना सहज स्वीकार्य असा पर्याय आहेत.

 नेतृत्व उभं करता येत नाही, हा आरोप दिशाभूल करणारा

काँग्रेसकडून सांगण्यात आले की, कोणतीही पार्टी सोडून,काँग्रेसमध्ये आलेली व्यक्ती म्हणजे त्यांचा मालकी हक्क नाही. लोकशाहीमध्ये जेथे न्याय, आदर आणि सामाजिक विकासाची संधी दिसते, त्या ठिकाणीच कार्यकर्ते जातात. आणि काँग्रेसमध्ये या सर्व गोष्टींचा समाविष्ट आहे.त्यामुळे एखाद्या नेत्याने काँग्रेसची निवड केली तर त्याला आयात म्हणणे हे बालिश आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

लोकांचं हित प्रथम — ही काँग्रेसची भूमिका

काँग्रेसने सांगितले की, उमेदवाराची निवड जात, पक्षपरिवार किंवा जुने–नवे यातून नाही, तर त्यांच्या कर्मयोग, उपस्थिती, समाजकार्यातील सहभाग आणि सार्वजनिक विश्वासावरून झाली आहे.

काँग्रेस हे शहरात गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य,जनसंपर्क आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सक्रिय होते.लोकसेवा हा काँग्रेसचा सातत्यपूर्ण प्रवास आहे, निवडणूक हा फक्त एक टप्पा आहे.महिला–सक्षमीकरण, विद्यार्थ्यांशी निगडित उपक्रम, दुर्बल घटकांसाठी राबवलेले कार्यक्रम याचा उल्लेख काँग्रेसने केला.काँग्रेसचा दावा आहे की शहराला आज पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतत लोकसंपर्कावर चालणारे प्रशासन हवे आणि त्यासाठी त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम आहे.

काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी असल्याचा आरोप विपक्ष कडून केला जात असताना, काँग्रेसने स्पष्ट केले की,टीम काँग्रेस एकसंध आहे. उमेदवारांच्या निवडीत पक्ष कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक लोकांचा विस्तृत सहभाग होता.त्यामुळे हे नेतृत्व थोपवलेले नाही, तर निवडलेले असल्याचा दावा करण्यात आला.

विकास, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष जनसंपर्क हेच आमचे बलस्थान

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात सौ एकता प्रशांत समर्थ यांच्या प्रचाराला मिळणारा लोकांचा प्रतिसाद, घराघरात केलेला संपर्क, प्रत्येक प्रभागातील सक्रिय संवाद या गोष्टी काँग्रेससाठी सकारात्मक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!