Sunday, April 19, 2026
Homeअज्ञात लाशमानवतेचा जिवंत आदर्श — समाजसेवक संदीप आगडे यांनी दाखविली खरी संवेदनशीलता

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मानवतेचा जिवंत आदर्श — समाजसेवक संदीप आगडे यांनी दाखविली खरी संवेदनशीलता

मुल ( मेहुल मनियार )

      गोंदिया–बल्लारशहा पॅसेंजर गाडी नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मूल रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. प्रवासी उतरत असताना एका डब्यात एक अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. लगेचच स्टेशन मास्टर यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
सूचना मिळताच मुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. मात्र, मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
याचदरम्यान, शहरातील प्रसिद्ध समाजसेवक संदीप आगडे यांना ही बाब कळताच त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःची गाडी घटनास्थळी पाठवली आणि पोलिसांच्या उपस्थितीत स्वतः सुद्धा उपस्थित राहून, मृतदेह अत्यंत सन्मानाने रुग्णालयात हलविण्यात मदत केली.
संदीप आगडे यांच्या या तत्परतेची आणि सामाजिक जाणीवेची शहरभर चर्चा असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.अशा प्रसंगी संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करणे हेच खरे समाजकार्य आहे.
दरम्यान, मूल पोलिसांनी अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!