Saturday, June 13, 2026
Homeनेत्रदान जागरूकतामुल येथील कृषी महाविद्यालयात जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्र तपासणी व जनजागृती शिबीर...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयात जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्र तपासणी व जनजागृती शिबीर शिबिर

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

महाराष्ट्रातील सेवाभावी व ख्यातनाम नेत्रशल्यचिकित्सक डॉ. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि नेत्रदानाच्या मानवतावादी विचारांना पुढे नेण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल येथे दि. १० जून २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना द्वारे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय नेत्र तपासणी व नेत्रदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

     कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात  प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालय सावलीचे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. डी. डी. येरमे, आणि  पवन गणुरे, नेत्र चिकित्सा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी उपस्थित होते. यावेळी  डी. डी. येरमे यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, डोळे हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील अवयव आहे. डोळ्यांमुळेच आपण सृष्टीचे सौंदर्य, निसर्गातील विविध रंग आणि आपल्या आप्तस्वकीयांचे चेहरे पाहू शकतो. मात्र, जगभरात तसेच भारतात लाखो लोक कॉर्नियल अंधत्वामुळे (पारदर्शक बुबुळाच्या आजारामुळे) दृष्टीपासून वंचित आहेत. अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे मरणोत्तर नेत्रदान होय. नेत्रदानासाठी कोणत्याही वयाचे किंवा व्यक्तीचे कठोर बंधन नसून, मृत्यूनंतर नातेवाईकांनी तात्काळ नेत्रपेढीशी संपर्क साधल्यास तज्ज्ञांकडून सुरक्षितपणे कॉर्नियाचे संकलन केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, नेत्रदानासंदर्भातील माहितीसाठी राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १९१९ तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी ०७१७२-२५०४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी नेत्रदान हे समाजाप्रती असलेले सर्वोच्च मानवतावादी योगदान असल्याचे सांगितले. मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दुसऱ्या व्यक्तीला जग पाहण्याची संधी मिळते, ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे नमूद करत त्यांनी “मरावे परी कीर्तिरूपी उरावे” या उक्तीचा संदर्भ देत प्रत्येकाने नेत्रदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याने त्यांनी स्वतः जागरूक राहून आपल्या कुटुंबीय व समाजामध्ये नेत्रदानाचा संदेश पोहोचवावा, असेही त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये ७९ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४० जणांनी नेत्रदानासाठी संमतीपत्र भरून सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक (मृदा विज्ञान) यांनी केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!