Saturday, August 22, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठककृषि महाविद्यालय द्वारा शेतकरी शास्त्रज्ञ मंच ची 39वी बैठक संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय द्वारा शेतकरी शास्त्रज्ञ मंच ची 39वी बैठक संपन्न

image_pdfimage_print

मुल  ( प्रा चंद्रकांत मनियार )

मूल येथील कृषी महाविद्यालय, द्वारा आयोजित 39वी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ शुक्रवार रोजी  मूल तालुक्यातील ग्राम मारोडा  येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी भिकारू शेंडे,  देविदास गिरडकर, इतर शेतकरी तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “ उन्हाळी हंगामात धान पिकातील व्यवस्थापन व फळझाडांची लागवड” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी शाश्वत विकासासाठी एकात्मिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होईल तसेच अधिक नफा मिळेल असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीतील शाश्वत उत्पादनासाठी पारंपारिक पिकांसोबत फळझाडांची पिकांची लागवड करणे काळाची गरज आहे असे सांगितले. उद्यानविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. एस. वाय. कडू, यांनी शेतकऱ्यांनी फणस, जांभूळ, सिताफळ आणि शेवगा या फळझाडांची लागवड करून अधिक आर्थिक मिळकत मिळवू शकते असे सांगून फळझाडांची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या व वाणाच्या वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्‍नील ठाकरे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना उन्हाळी भात पिकातील तण व खत व्यवस्थापन तसेच धानाच्या तनिसाचा व जैविक विघटकाच्या वापर करून कंपोस्ट खत तयार करून त्याच्या वापर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी करावे असे सुचविले.
कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. अमरदीप डेरे,  यांनी शेततळे तसेच पाणलोटच्या माध्यमातून पाण्याच्या काटेकोर वापर कसे करावे यावर मार्गदर्शन केले. डॉ. भूषण ठाकरे, कीटकशास्त्र विषयतज्ञ यांनी उन्हाळी भात पिकातील किडींचे एकात्मिक पद्धतीने या विषयावर मार्गदर्शन केले. कीटकनाशकाच्या अतिरेक वापरण्याचे परिणाम समजून सांगितले.

सदर कार्यक्रमास एकुण ३२ शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मृदाशास्त्र विषयतज्ञ डॉ. अक्षय इंगोले यांनी मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!