Friday, August 21, 2026
Homeप्रवेश बंदी15 ऑगस्ट ला सोमनाथ पर्यटन स्थळात पर्यटकांना प्रवेश बंदी
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

15 ऑगस्ट ला सोमनाथ पर्यटन स्थळात पर्यटकांना प्रवेश बंदी

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

15 ऑगस्ट 2026 शनिवारला सोमनाथ पर्यटन स्थळात पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही, याबाबतचे आदेश मूल चे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी काढले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने पर्यटकाची फार गर्दी असते. सामान्य पणे सोमनाथ धबधबा हे क्षेत्र बफर क्षेत्र असल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षितते च्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात नमूद आहे. अफाट गर्दीमुळे भाविकांना सुद्धा फार त्रास होतो.

या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे पर्यटकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता 15 ऑगस्ट 2026 ला पर्यटकांनी सोमनाथ पर्यटन स्थळात प्रवेश करू नये, असा आदेश निर्गमित केला आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!